वाराणसीतून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘आप’ने शड्ड ठोकणे, हे केवळ प्रतीकात्मक नाही, तर मोदींचा पराभव करण्यासाठीच आपण तेथून निवडणूक लढवीत आहोत, असा दावा ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आह़े ‘आम्ही वाराणसीत जाऊन जनतेचे मत विचारणार आहोत़ मी मोदींविरोधात लढावे, असे जनतेने सांगितले तर मी लढण्यास सिद्ध आहे, असेही ते म्हणाल़े

हा प्रतीकात्मक लढा असल्याचे मी वर्तमानपत्र आणि संकेतस्थळांवर वाचल़े परंतु, मला स्पष्ट करायचे आहे की आम्ही तिथे निवडणूक लढण्यास नव्हे, तर मोदींना धूळ चारण्यास जात आहोत, असे केजरीवाल येथे म्हणाल़े ‘रोडमॅप टू इंडियन मुस्लीम’ परिषदेत ते बोलत होत़े या परिषदेत प्रशांत भूषण, गोपाळ राय आदी आपनेतेही सहभागी झाले होत़े अल्पसंख्याकांनी वाराणसीत पाठिंबा द्यावा, असे आवाहन या वेळी केजरीवाल यांनी केल़े