रेल्वे दरवाढीवर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी जोरदार टीका केली आहे. दरवाढ आटोक्यात आणण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिले होते, मात्र हा निर्णय त्या विरोधातील आहे, असेही देवेगौडा म्हणाले.दरवाढीसारख्या प्रश्नावर मोदी यांनी निवडणूक लढविली असताना रेल्वेमंत्र्यांनी मात्र त्यापुढे जाऊन दरवाढीची घोषणा केली. याचा परिणाम अनेक प्रकारे होणार आहे, असेही माजी पंतप्रधान म्हणाले.

Story img Loader