बाहेरून आलेल्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य मिळाल्याने बिहारमध्ये संयुक्त जनता दलामध्ये असंतोष उफाळून आला आहे. काही जणांनी वरिष्ठ नेत्यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ मंत्री नरेंद्र सिंह, ब्रिशन पटेल तसेच खासदार विश्वमोहन कुमार आणि अश्वमेध देवी यांनी पक्षाध्यक्ष शरद यादव यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. चित्रपट निर्माते प्रकाश झा तसेच वैद्यनाथ महातो आणि अविनाश कुमार सिंह यांना उमेदवारी देण्यास सिंह यांनी आक्षेप घेतला. अविनाश कुमार हे भाजपमधून जनता दलामध्ये आले असून त्यांना मोतिहारी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. अनेक निष्ठावान कार्यकर्ते असताना उपऱ्यांना संधी देणे चुकीचे असल्याचे पटेल यांनी सांगितले. नव्या लोकांचे पक्षात स्वागत आहे, पण लगेच त्यांना उमेदवारी देणे चुकीचे असल्याचे सांगितले.
बिहारच्या जनता दलामध्ये असंतोष
बाहेरून आलेल्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य मिळाल्याने बिहारमध्ये संयुक्त जनता दलामध्ये असंतोष उफाळून आला आहे. काही जणांनी वरिष्ठ नेत्यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली.
First published on: 14-03-2014 at 12:02 IST
TOPICSजेडीयूJDUलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfaction in bihar janata darbar