काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या ‘स्टार प्रचारक’ प्रियंका गांधी यांनी रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला़  देशाचा कारभार चालविण्यासाठी ५६ इंची छातीची नव्हे, तर विशाल अंत:करणाची आवश्यकता आहे, असा टोला प्रियंका यांनी रायबरेलीतील निवडणूक प्रचारसभेत लगावला़  भाजपची सध्याची अवस्था म्हणजे ‘चिकटल्यामुळे गोंधळलेल्या उंदरासारखी’ झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षाची खिल्ली उडवली.
भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात ८ मिनिटांची ध्वनिचित्रफीत आणि सहा पानी पुस्तिका प्रकाशित केली. त्यामुळे खवळलेल्या प्रियंका यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढविला. एखाद्या पक्षाने कितीही खोटा प्रचार केला तरी आपण विचलित होणार नाही, या लोकांच्या विघातक राजकारणात मला काडीचाही रस नाही, असे बोल त्यांनी भाजपला सुनावले.  
हा देश महात्मा गांधींचा आह़े  हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन अशा सर्वधर्मीयांचा आह़े सर्वानीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मसमर्पण केले आह़े  दलित आणि आदिवासींनीही देशासाठी बलिदान केले आह़े  हा तुमचा देश आहे आणि तुम्ही त्याचे रक्षक आहात़  हा माझा देश आहे आणि माझ्या दमन्यांतून वाहणाऱ्या रक्तामध्ये या देशाची माती मिसळलेली आहे, असे आवेशपूर्ण भाषण प्रियंका यांनी केल़े
निवडणुका हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आह़े  तुम्हाला या देशाला समर्थ करण्यासाठी मतदान करायचे आह़े  ३० एप्रिल रोजी तुम्ही स्वत:साठी मतदान करू नका़  सोनियाजी, विकास या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत, परंतु देशाचे ऐक्य राखणे त्याहूनही महत्त्वाचे आणि त्यासाठीच तुम्ही मतदान करा, असे आवाहन प्रियंका यांनी केल़े  
‘गरज विशाल अंतकरणाची.’
उत्तर प्रदेशचे गुजरात करण्यासाठी ५६ इंची छातीची आवश्यकता असल्याचे वक्तव्य मोदींनी केले होत़े  त्याचा प्रियंका यांनी समाचार घेतला. देश चालविण्यासाठी ५६ इंची छाती किं वा नृशंस शक्तींची नव्हे तर विशाल अंत:करण, नैतिक बळ आणि आत्मिक शक्तीची गरज असत़े संस्कृती रक्षणासाठी प्रसंगी प्राणही वेचण्याची आवश्यकता असते, असे त्या म्हणाल्या़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा