नरेंद्र मोदी यांना वाराणसी येथे सभा घेण्यास परवानगी नाकारल्यामुळे भाजपच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी बाँबगोळा टाकला. भाजपशासित गुजरात राज्यातील पोलिसांकडूनच सभास्थानाविषयी ‘नकारात्मक अभिप्राय’ आल्यामुळे ही परवानगी नाकारल्याचे आयोगाने स्पष्ट केले. मात्र त्याच वेळी, ‘संबंधित पक्षाला ही परवानगी नाकारल्याचे कळविण्यास अंमळ उशीरच झाला आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत’, असेही निवडणूक आयोगाने पुढे नमूद केले.
मोदी यांच्या प्रचारसभेचे ठिकाण अत्यंत गजबजलेले आणि प्रवासाच्या दृष्टीने गुंतागुंतीचे होते, असे सांगत मोदी यांच्या पथकातील पोलिसांनी सभास्थान योग्य नसल्याचा शेरा मारला होता, अशी माहिती निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी दिली. गुरुवारी नरेंद्र मोदी बेनिया बाग परिसरात एक प्रचारसभा घेणार होते. मात्र ती घेण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने भाजपने निवडणूक आयोगावरच शरसंधान केले होते.
आयोगावर टीका करणाऱ्या भाजप आणि नरेंद्र मोदींवरच भाकपने जोरदार हल्ला चढविला आहे. ही कृती चुकीचे असल्याचे भाकपने स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा