फुलांचे मशीन!
हजारोंच्या गर्दीतही आपल्याला आपल्या नेत्याने आपल्याला ओळखण्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात. त्यात उत्तर प्रदेश असेल तर काही विचारायलाच नको. रस्त्यावर हजारोंची गर्दी. चाळिशीच्या वर पारा. खुल्या वाहनात स्वार झालेले नेते घामामुळे अस्वस्थ. त्याच डीजेच्या तालावर नाचता-नाचता वाहनावर फुले उधळण्याच्या नादात आपण नेत्याला फुलं फेकून मारत आहोत याचेही भान कार्यकर्त्यांना राहात नाही. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असाच अनुभव राहुल गांधी व अखिलेश यादव यांना आला. रस्त्यारस्त्यावर फुलं उधळून स्वागत केले जात होते. राहुल गांधी यांच्या वाहनाच्या उंचीमुळे त्यांच्यापर्यंत फार कमी फुलं पोहोचत होती. भय्याजींना त्रास होतोय म्हणून समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी शक्कल लढवली. वाराणसीच्या दोन चौकांत फुलं उधळण्यासाठी थेट मशीनच लावले. मशीन कसले? सुपासारखे कसले तरी यंत्र होते. त्यातून फुलं उधळली जात होती. ते पाहून भय्याजी आनंदले. समाजवादी पक्ष बदललाय. लॅपटॉप चालत नसले म्हणून काय झाले? प्रगती तर झाली.
फुलांचे मशीन!
हजारोंच्या गर्दीतही आपल्याला आपल्या नेत्याने आपल्याला ओळखण्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात. त्यात उत्तर प्रदेश असेल तर काही विचारायलाच नको. रस्त्यावर हजारोंची गर्दी. चाळिशीच्या वर पारा. खुल्या वाहनात स्वार झालेले नेते घामामुळे अस्वस्थ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-05-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election days situation in varanasi