लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घराघरांत आपल्या उमेदवाराचा प्रचार व्हावा यासाठी विविध राजकीय पक्ष प्रत्येक प्रचारतंत्राचा खुबीने वापर करत आहेत. त्यात अर्थातच सोशल मीडियाच्या वापराला सर्वाधिक प्राधान्य आहे. फेसबुक, ट्विटर, यू टय़ूबला अनेक उमेदवारांनी पसंती दिली असली तरी तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेल्या व्हॉट्स अ‍ॅपपासून पक्ष आणि उमेदवार चार हात लांबच असल्याचे दिसून आले आहे.
आणखी आठवडाभराने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. त्यानिमित्ताने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात दिलेल्या माहितीनुसार अनेकांची फेसबुक आणि ट्विटरची खाती आहेत. मात्र, व्हॉट्स अ‍ॅपवर फारच कमी अकाऊंटधारक आहेत.

सोशल मीडियावरील प्रचारखर्च ५०० कोटी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ८१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील २० कोटी मतदार रोज या ना त्या कारणाने इंटरनेटचा वापर करतात तर या २० कोटींपैकी किमान निम्मे तरी मतदार यंदा प्रथमच मतदान करणार आहेत. या तरुण मतदारांना साद घालण्यासाठी राजकीय पक्षांनी फेसबुक, ट्विटर, यू-टय़ूब आदींना प्राधान्य दिले आहे. त्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मोदी-केजरीवाल सर्वाधिक सक्रिय
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल हे सोशल मीडियावर सर्वात सक्रिय आहेत. ट्विटर अकाऊंटवरून ते कायमच व्यक्त होत असतात.

सोशल मीडियावर सक्रिय
०अजय माकन (काँग्रेस)
०कपिल सिबल (काँग्रेस)
०एलके अडवाणी (भाजप)
०अरुण जेटली (भाजप)
०शशी थरूर (काँग्रेस)
०शाजिया इल्मी (आप)

सोशल मीडियावर निष्क्रिय
० सोनिया गांधी
राहुल गांधी<br />० प्रियांका गांधी
० सचिन पायलट
० ज्योतिरादित्य शिंदे

Story img Loader