बाजारात चांदीच्या सध्याच्या किंमती लोकसभा निवडणूकीतील महिला उमेदवारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत कारण, चांदीच्या दरातील वाढ महिला उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती वाढीचे महत्वाचे कारण ठरल्याचे समोर आले आहे. याचा अनेक बड्या नेत्यांना फटका बसला आहे.
सोनिया गांधी, सुषमा स्वराज, सुप्रिया सुळे, जया प्रदा यांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या आपल्या संपत्तीमध्ये त्यांच्याकडील चांदीच्या वस्तूंमध्ये २००९ सालामधील प्रतिज्ञापत्रानुसार कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही परंतु, चांदीच्या किंमती मात्र, गेल्या पाच वर्षांत दुप्पट पटीने वाढल्यामुळे यावेळीच्या प्रतिज्ञापत्रात सध्याच्या बाजारभावानुसार नोंद करण्यात आलेली आहे. सध्या चांदीचा भाव ४३,००० किलोग्रॅम इतका आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मालमत्तेत २००९ सालापासून आतापर्यंत ८८ किलोग्रॅम इतके चांदी आहे. याची एकूण किंमत ३९.१६ लाख इतकी नोंद करण्यात आली आहे. हीच किंमत २००९ सालच्या सोनियांच्या प्रतिज्ञापत्रात केवळ १८.३७ लाख इतकी होती. त्यामुळे चांदीच्या दरातील वाढ सोनियांनांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीवाढीला महत्वाचे कारण ठरल्याचे दिसते.
भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्याजवळ सध्या ५.५ किलोग्रॅम इतके चांदी आहे. याची एकूण किंमत २.३६ लाख इतकी आहे. २००९ साली सुषमा स्वराज यांच्याकडे केवळ ४०० ग्रॅम चांदी होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याजवळही एकूण ४.३ लाखांची चांदीची मालमत्ता आहे. उत्तरप्रदेशातून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री जया प्रदा यांच्याजवळ २००९ सालापासून आतापर्यंत एकूण १.५ किलोग्रॅम चांदी आहे. २००९ सालच्या प्रतिज्ञापत्रात याची एकूण किंमत ३०,००० रुपये इतकी होती. यावेळी तितक्याच चांदीची किंमत ६९,००० रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाचवर्षांतील चांदीच्या किंमतींतील वाढ राजकीय नेत्यांच्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीची आकडेवारी मोठी करणारी ठरली आहे.
‘चांदी’ची भाववाढ सुषमा, सुप्रिया आणि सोनियांना पडली महागात
बाजारात चांदीच्या सध्याच्या किंमती लोकसभा निवडणूकीतील महिला उमेदवारांना चांगल्याच महागात पडल्या आहेत कारण, चांदीच्या दरातील वाढ महिला उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती वाढीचे महत्वाचे कारण ठरल्याचे समोर आले आहे. याचा अनेक बड्या नेत्यांना फटका बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-04-2014 at 02:13 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family silver adds sheen to netas assets