काही महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटणारी साताऱ्याची लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. रिंगणात असलेले तब्बल १८ उमेदवार, राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस, महायुतीतली बिघाडी आणि मतदारसंघाचे मागासलेपण या साऱ्यांचा परिणाम यंदाच्या निवडणुकीवर होणार आहे. यामुळे विजयी उमेदवाराच्या गळ्यात निसटत्या मतांचीच माळ पडणार असेच आजचे चित्र दिसत आहे.
सातारा हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला. यशवंतराव चव्हाण यांचा हा मतदारसंघ. लोकसभेच्या एकूण १५ निवडणुकांपकी तब्बल १० वेळा काँग्रेसने या मतदारसंघावर वर्चस्व राखले. तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस, एकदा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या रूपाने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून शिवसेनेने या मतदारसंघात विजय संपादन केला आहे.
गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजय मिळवलेले उदयनराजे भोसले यांना यंदा पक्ष उमेदवारी देणार का, हा विषय सुरुवातीचे दोन आठवडे चच्रेत होता. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी खा. भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात प्रबळ उमेदवारी ही अपक्ष लढणारे पुरुषोत्तम जाधव यांची मानली जात आहे. गेल्या वेळी युतीकडून लढणाऱ्या जाधव यांनी यंदा बंडखोरी केली आहे. शिवसेना आणि भाजपचे अनेक नेते, कार्यकत्रे हे जाधव यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट आहे. नाराज संकपाळ यांनीही जाधव यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीतील उदयनराजेंच्या विरोधातील मोठा गटही छुप्या पद्धतीने जाधव यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे.
या निवडणुकीसाठी ‘आरपीआय’च्या मागणीनुसार शिवसेनेने सातारा मतदारसंघ रामदास आठवले यांना बहाल केला. मात्र महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या ‘आरपीआय’ला निवडणुकीचे हे गणित सोडवण्यात अपयश आले. मतादरसंघातले मराठा प्राबल्य विचारात घेऊन आठवले यांनी संभाजी संकपाळ यांना उमेदवारी दिली, पण पुढे स्थानिक नेत्यांवर त्रास देत असल्याचा आरोप करत संकपाळ यांनी अर्ज माघारी घेतला. यानंतर मग ‘आरपीआय’चे जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड यांना आठवले यांनी उमेदवारी दिली. आम आदमीच्या वतीने राजेंद्र चोरगे यांना उमेदवारी मिळाली आहे. गेली पंधरा वष्रे त्यांनी खा. भोसले आणि खा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राजकीय विरोध केला आहे.
शिवरायांचे वंशज, सडेतोड-सर्वसामान्यांत मिसळणारे अशी उदयनराजेंची प्रतिमा असली तरी त्यांच्याकडून ज्या गतीने विकास अपेक्षित होता तो वेग त्यांना राखता आला नाही.
आमदार-खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये नसलेले मनोमीलन, जिल्ह्य़ातले पाटबंधारे विभागाचे रखडलेले प्रश्न, पुनर्वसनाच्या समस्या, जावली- महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे करणे, औद्योगिकीकरणाची मंद गती, उद्ध्वस्त औद्योगिक वसाहती, वाढती गुंडगिरी, टोल नाक्यांच्या प्रश्न हे सर्व मुद्दे अडचणीचे ठरू शकतात. एकूणच वरवर सोपी वाटणारी ही लढत आतून चुरशीची होईल.
लढत वरवर सोपी; आतून अवघड
काही महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटणारी साताऱ्याची लढत अखेरच्या टप्प्यात रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. रिंगणात असलेले तब्बल १८ उमेदवार,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-04-2014 at 04:13 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight for satara lok sabha battle reached in interesting stage