वाराणसी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्याविरोधात सोमवारी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदविण्यात आला. मतदान केंद्रात मतदानासाठी जाताना राय यांनी आपल्या शर्टावर पक्षाचे निवडणूक चिन्ह प्रदर्शित करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
येथील सिगरा पोलीस ठाण्यात राय यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १२६ आणि १३० अन्वये आणि भादंविच्या १७१(एच) अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. विशेष निवडणूक निरीक्षक प्रवीण कुमार यांनी पाठविलेल्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर आयोगाने जिल्हा प्रशासनाला एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला.
सोमवारी सकाळी अजय राय आपल्या कुटुंबीयांसमवेत चेतगंज विभागातील रमाकांतनगर येथे मतदानासाठी आले होते तेव्हा त्यांनी आपल्या शर्टावर काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला (‘हात’) बिल्ला लावला होता. आप आणि भाजपने राय यांच्या कृतीचा निषेध नोंदविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा