शिवसेनेसाठी ‘गद्दारी’ची परंपरा असलेल्या परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी महायुतीच्या संजय जाधव यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. शिवसनिकांचा जुना उत्साह ओसरल्यामुळे नरेंद्र मोदी यांची लाट आणि आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपूडकर, सीताराम घनदाट यांच्याच ‘पक्ष-निरपेक्ष’ सहकाऱ्यावर शिवसेनेची भिस्त आहे.
परभणी मतदारसंघात १९८९ पासून सेनेचे वर्चस्व आहे. गेल्या २५ वर्षांत सेनेने या मतदारसंघात कोणतेही भरीव काम केले नाही. पैकीगेल्या १० वर्षांत या ना त्या कारणाने सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचे बळ मिळाले. विधानसभेला उमेदवार काँग्रेसचा असतो, त्यामुळे राष्ट्रवादीचे लोक सेनेला मदत करतात आणि लोकसभेला उमेदवार राष्ट्रवादीचा, त्यामुळे काँग्रेसचे लोक सेनेलाच मदत करतात. या वेळी पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी झपाटय़ाने कामाला लागली आहे. बोर्डीकर यांचा अपवाद वगळता काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी त्यांचा सर्व संच भांबळे यांच्या पाठीशी उभा केला.
एकीकडे मोदी लाटेचे मतांमध्ये रूपांतर होईल, अशी अपेक्षा आणि दुसरीकडे बाहेरच्या पक्षांकडून अपेक्षित असलेली रसद यावरच सध्या सेनेचा डोलारा अवलंबून आहे. प्रामाणिक व निष्ठावान शिवसनिकांपेक्षाही बोर्डीकर, घनदाट व पडद्याआडून वरपूडकर यांची होणारी मदत सध्या सेनेच्या उमेदवाराला जास्त लाभदायी ठरेल, असे वाटू लागले आहे.
सलग ३ निवडणुकांत राष्ट्रवादीच्या वरपूडकर यांनी पराभव स्वीकारला. या वेळी मात्र वरपूडकरांपेक्षा किती तरी सरस अशी भांबळे यांची उमेदवारी आहे. काँग्रेसचे सहकार्य व दुसरीकडे सेनेची खरी ताकद असलेल्या तरुण वर्गातही शिरकाव ही भांबळे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता सेनाच खात्रीने येणार असे सहज बोलले जायचे. या निवडणुकीत तशी खात्री कोणालाही देता येत नाही, इतपत आव्हान भांबळे यांनी उभे केले. भाकपचे राजन क्षीरसागर हेही िरगणात आहेत. आजवर शेतकरी-शेतमजूर, बेरोजगारांसाठी उभारलेल्या चळवळीची पाश्र्वभूमी त्यांना आहे. परभणी मतदारसंघात दलित-मुस्लिम मतांचे प्राबल्य मोठे आहे. या मतांची विभागणी होण्याची शक्यता नसल्याने येथील लढत ही थेट आहे. सेनेला बालेकिल्ल्याची इभ्रत राखण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागेल, अशी स्थिती आहे.
बालेकिल्ल्यासाठी सेनेची बाहेरील रसदीवर भिस्त!
शिवसेनेसाठी ‘गद्दारी’ची परंपरा असलेल्या परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी महायुतीच्या संजय जाधव यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-04-2014 at 02:27 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time shiv sena face big challenge in parbhani constituency