बिहारमधील जनतेच्या नसानसांत जातीयवाद भिनला असल्याने जातीयवादाबाबतची सर्वाधिक चर्चा याच राज्यात होत असल्याची टीका भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.
भाजप हा जातीयवादाच्या विरोधात असल्याचा दावा पक्षाकडून केला जात असतानाही बिहारमधील भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या जातीचा सातत्याने उल्लेख का करतात, असा सवाल गडकरी यांना विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले. तथापि, गडकरी यांनी लगेचच चूक सुधारली आणि डीएनएऐवजी राजकारण हा पर्यायी शब्द वापरण्याची सूचना वार्ताहरांना केली. नितीशकुमार यांनी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध केला, त्याचे स्मरण गडकरी यांनी करून दिले.
किसनगंजमधून जद(यू)चे उमेदवार अख्तरुल इमान यांनी उमेदवारी मागे घेतली त्याबाबत बोलताना, काँग्रेसच्या सूचनेवरून हा प्रकार घडला असून त्याचा लाभ काँग्रेसला होणार आहे, असा आरोप गडकरींनी केला.
राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा वचननाम्यातील मुद्दा हा भाजपचा असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)चा त्याच्याशी काहीही संबंध नाही़, असे स्पष्टीकरण गडकरी यांनी केल़े