समाजात द्वेष पसरविणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंग यांनी आता उंबरठय़ावर येऊन ठेपलेली अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ बिहार आणि झारखंड पोलिसांनी सिंग यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी धाड टाकल्यानंतर तासाभरातच सिंग यांनी तातडीने येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आह़े सिंग यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी जिल्हा न्यायदंडाधिकारी वीरेंद्र कुमार यांनी शुक्रवारी ठेवली आह़े विमानतळ पोलीस ठाण्यात सिंग यांच्याविरोधात २१ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवाला(एफआयआर)संदर्भात हा जामीन अर्ज करण्यात आला आह़े
‘मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे,’ असे विधान झारखंडमधील देवघर जिल्ह्य़ात १९ एप्रिल रोजीच्या एका प्रचारसभेत बोलताना सिंग यांनी केले होत़े या विधानाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार, सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा