निवडणुका जवळ आल्यामुळे जनहिताचे निर्णय घेताना आघाडी सरकार गेल्या तीन महिन्यांत जितके गतिशील झाले आहेत तितके सुरुवातीपासूनच राहिले असते तर निर्णय घेण्यासाठी कोणताही विषय शिल्लकच राहिला नसता, अशी स्पष्ट कबुली गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.  पांढरकवडा येथे ६७ कोटी रुपये खर्चून पोलीस वसाहतीचे उद्घाटन आर.आर. पाटील यांच्या हस्ते झाले. पोलीस वसाहतीसाठी पाणीपट्टी पूर्णत: माफ केल्याचे आपल्या भाषणात जेव्हा नगराध्यक्ष शंकर बढे यांनी सांगितले तेव्हा आर.आर. पाटील म्हणाले, ही गौरवाची बाब नाही. पोलिसांना पगार बरे आहेत. त्यांनी स्वत:हून पाणीपट्टी भरली पाहिजे. कोणतीही गोष्ट फुकट मिळविण्याची सवय लागली की, सर्वच काही मग फुकटात मिळाले पाहिजे  अशी अपेक्षा असते, असे सांगून पाटील म्हणाले, अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून लोक रस्त्यावर येतात. ही बाब पोलिसांसाठी भूषणावह नाही अशी नाराजी व्यक्त केली.
पोलिसांच्या वेतनवाढीचे संकेत
पोलिसांच्या वेतनात वाढ करण्याच्या दृष्टीने एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने आपला अहवाल लवकर द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

Story img Loader