उत्तर -पश्चिम मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांनी डमी उमेदवार उभा केल्याचा आम आदमी पार्टीचे उमेदवार मयांक गांधी यांनी केलेला आरोप कामत यांनी फेटाळून लावला. खोटय़ा आरोपांवरून न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा कामत यांनी दिला़
या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश मलिक हे कामत यांनी उभे केलेले डमी उमेदवार असल्याचा आरोप गांधी यांनी केला होता. मलिक हे मुंबई काँग्रेसचे माजी पदाधिकारी असले तरी त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पक्षाचा राजीनामा दिला. गेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आल्याने मलिक हे संतप्त झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत कामत यांचे मुख्य प्रतिनिधी अमरजितसिंह मनहास यांनी मलिक यांच्याशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट केले होते याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा