हिंगोली लोकसभेच्या सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आघाडीचे आमदार असले, तरी खासदार मात्र शिवसेनेचा. जिल्हा परिषदेतही सेनेचे एकहाती वर्चस्व. मात्र, दोन्ही पातळ्यांवर रचनात्मक कृतिशून्यता. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा व त्यांचे समर्थक सेनेच्या प्रचारापासून दूरच आहेत. दुसरीकडे आघाडीतही सारे काही आलबेल नसल्याचे चित्र. माजी खासदार शिवाजी माने आता कोठे
हिंगोलीतील लढतीला असे रंग प्राप्त झाले आहेत. रिंगणात २३ उमेदवार असले, तरी वानखेडे-सातव अशीच सरळ लढत होत आहे. नांदेड जिल्हय़ातील किनवट व हदगाव, यवतमाळ जिल्हय़ातील उमरखेड आणि िहगोलीतील िहगोली, कळमनुरी, वसमत हे ६ विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येतात. मतदारसंघात प्रामुख्याने मराठा, बंजारा, मुस्लीम, मागासवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे. मात्र, जाती-पातीच्या राजकारणाला फारसा वाव नाही. बंजारा समाजाचे दिवंगत उत्तमराव राठोड, तसेच कोमटी समाज अत्यल्प असताना दिवंगत विलास गुंडेवार यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. हा इतिहास पाहता या मतदारसंघात जाती-पातीची समीकरणे अजून तरी तितकीशी प्रभावी ठरू शकलेली नाहीत.
िहगोली, कळमनुरी, हदगाव व उमरखेड येथे काँग्रेस, तर किनवट व वसमतला राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सातव यांच्यासाठी ही जमेची बाजू. हे सर्वच जण आघाडीचा धर्म पाळण्यासाठी जीव ओतून प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादीचे बोटावर मोजण्याइतके कार्यकत्रे वरवर आघाडीचा धर्म पाळण्याची भाषा करीत असले, तरी शेवटपर्यंत ते नेमकी कोणती भूमिका पार पाडतात, यावर इतरांची बारीक नजर आहे.
िहगोली जिल्हा परिषदेत प्रथमच शिवसेनेची एकहाती सत्ता आली. मात्र, हीच सत्ता सेनेअंतर्गत गटबाजीला कारण ठरली. युतीच्या राजवटीतील माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, गजाननराव घुगे यांचा गट, तर खासदार वानखेडे यांचा दुसरा गट जि. प. अध्यक्ष निवडणुकीपासून तयार झाला. त्यांचे अजूनही मनोमीलन झाले नाही. रिपाइं आठवले गटाचे मराठवाडा सचिव दिवाकर माने हेही महायुतीच्या प्रचारापासून दूरच आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेनेने दगा दिल्यामुळे जि. प. सभागृहात भाजपला खातेही खोलता आले नाही. त्यामुळे भाजपमध्येही सुप्त नाराजी आहे.
सातव यांची प्रचार यंत्रणा सक्षम असली, तरी फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांत निवडणुकीविषयी नराश्य, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून चाललेला ‘हर हर मोदी’चा उदो उदो, याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावर काय होतील? याची चर्चा होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा