मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतच्या वादाला आणखी नवे वळण मिळाले. एका कार्यक्रमात त्यांना पदवीबाबत प्रश्न विचारला असता, अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या येल विद्यापीठाची पदवी असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
१६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर स्मृती इराणी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला होता. २००४ आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात शिक्षणावरून परस्परविरोधी माहिती पुढे आल्याने वाद निर्माण झाला होता. माझे जे ध्येय आहे त्यावरून परावृत्त करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे, मात्र मंत्री म्हणून केलेल्या कामाच्या आधारे मूल्यमापन करा, असे त्यांनी उपस्थितांना सुचवले. शैक्षणिक पात्रतेबाबत जो वाद आहे तो थांबवण्यासाठी सविस्तर उत्तर द्या, असा आग्रह प्रश्नकर्त्यांने धरताच, जनहित याचिका दाखल करा, मी निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राच्या वादाबाबत न्यायालयात उत्तर देऊन हा वाद निकाली काढीन असे उत्तर दिले. येल विद्यापीठातील पदवी कोणत्या स्वरूपाची आहे ते त्यांनी विस्ताराने सांगितले नाही. मात्र येल विद्यापीठात देशातील ११ सर्वपक्षीय खासदार गेल्या वर्षी १९ जून रोजी सहादिवसीय नेतृत्वगुण विषयक कार्यशाळेला गेले होते, त्यात स्मृती इराणींचा समावेश होता. अभ्यासक्रमविषयक कार्यक्रमात येलमधील प्राध्यापकांबरोबर आण्विक नि:शस्त्रीकरण, अरब जगतातील लोकशाही चळवळ, महिला सक्षमीकरण अशा अनेक विषयांवर चर्चेत खासदारांनी सहभाग घेतला होता. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू असून त्यात भारतातील ८० हून अधिक खासदारांनी सहभाग घेतला आहे.
स्मृती इराणींकडे येल विद्यापीठाची पदवी?
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतच्या वादाला आणखी नवे वळण मिळाले. एका कार्यक्रमात त्यांना पदवीबाबत प्रश्न विचारला असता, अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या येल विद्यापीठाची पदवी असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-08-2014 at 01:17 IST
Web Title: I have a degree from yale university says smriti irani