भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना काँग्रेसकडून सातत्याने लक्ष्य केले जात आह़े  २००२ सालच्या गुजरात दंगल प्रकरणाचा लगाम मोदींच्या वारूला लागण्यासाठी आता स्वतंत्र चौकशी समितीची मागणी करण्यात येत आह़े  विशेष तपास पथकाला अटक करण्याचे किंवा शोधकार्याचे मर्यादित अधिकार असल्यामुळे या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र तपास संस्थेकडे सोपवावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली आह़े
भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांच्या तपासावर लक्ष ठेवण्यात येते, मग माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलींशी संबंधित सर्व खटल्यांच्या तपासाकडेही स्वतंत्र संस्थेच्या माध्यमातून लक्ष ठेवावे, असे सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आह़े
२००८ साली म्हणजेच दंगलींनंतर तब्बल सहा वर्षांनी विशेष तपास पथक अस्तित्वात आल़े  परंतु, या पथकामध्येही तेच पोलीस अधिकारी होते ज्यांच्या अखत्यारीतच राज्यात दंगली झाल्या होत्या़  त्यातूनही या पथकाला सीबीआयसारखे शोधकार्याचे, तपासाचे विशेष अधिकार नाहीत़  त्यांनी केवळ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत़  अशा परिस्थितीत पीडितांना न्याय मिळणार नाही, असेही सिब्बल म्हणाल़े  तसेच केंद्रीय कायेदामंत्री म्हणून नव्हे तर काँग्रेसचा नेता आणि लोकसभेचा उमेदवार म्हणून हे मत नोंदवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल़े  गुजरात प्रशासनाचे २५ पोलीस अधिकारी बनावट चकमक प्रकरणांमध्ये तुरुंगात असल्यामुळे गुजरात प्रशासनावर मुळीच विश्वास नसल्याचेही त्यांनी म्हटल़े
देशात मोदी लाट असल्याचा भाजपचा दावा त्यांनी फेटाळून लावला़  जर मोदी लाट असती तर मोदी वाराणसी आणि वडोदरा अशा दोन जागांवरून का लढले असते,तसेच भाजपकडून प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े  यावरूनही हे सिद्ध होते की, मोदी एकटे भाजपला विजयापर्यंत नेऊ शकत नाहीत, असा आरोपही सिब्बल यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा