अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने अभिनेत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी जाहीर होताच याच मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार कुमार विश्वास यांनी स्मृती इराणींवर शाब्दीक हल्ला चढविला.  
अमेठीत आता ‘इराणी येवो अथवा पाकिस्तानी’ येथे काहीच फरक पडणार नाही कारण, येथील जनतेचा निर्णय झाला असल्याचे विश्वास म्हणाले. तसेच “अमेठीतील जनतेने निर्णय घेतला आहे. त्यांना कुशासन नको आहे. त्यामुळे अमेठीत इराणी येवो, पाकिस्तानी येवो, इटालियन येवो किंवा अमेरिकन येवो त्याचा काहीच फरक पडणार नाही.” असेही कुमारविश्वास म्हणाले.

Story img Loader