भारतीय जनता पक्षाचे(भाजप) नेते अरुण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर निशाणा साधत काँग्रेस पक्षाचा नारा ‘मै नही मॉम’ असा असायला हवा असे म्हटले आहे.
अरुण जेटली म्हणाले की, सोनिया आणि राहुल गांधी विविध ठिकाणी भाषणे देत आहेत. विविध चॅनेल्सवर त्यांच्या सतत जाहिरातीही सुरू आहेत. या जाहीरातींमधला काँग्रेसचा नारा बदलून मै नही मॉम असा करायला हवा. काँग्रेसचा प्रचार मतदारांना नकोसा झाला आहे. त्यांच्या जाहीरातीपाहून जनतेला कंटाळा आला आहे. काँग्रेसने काही केले तरी लोकसभा निवडणूकीमध्ये आम्हाला बहुमत मिळणार आहे. असेही जेटली म्हणाले.
“राहुल गांधींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि ती त्यांच्या भाषणातून जाणवते. काँग्रेसलाही ते कळाल्याने आजवर प्रचाराची धुरा सांभाळणाऱया राहुल गांधींऐवजी आता सोनिया गांधीच पुढे येऊन प्रचाराला लागल्या आहेत. तरीसुद्धा याचा काहीच फरक पडणार नाही.” असेही जेटली म्हणाले.

Story img Loader