पक्षविरोधी कारवाई केल्याच्या मुद्दय़ावरून संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य शिवानंद तिवारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत पक्षातून हकालपट्टी केली आहे. तिवारी यांच्याशिवाय अन्य चार खासदारांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविल्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
तिवारी यांच्याव्यतिरिक्त कॅप्टन जयनारायण निशद, पूर्णमसी राम, सुशीलकुमार सिंग, मंगनीलाल मंडल या लोकसभा सदस्यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी पक्षातर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पक्षाध्यक्षांनी पाच जणांना निलंबित केल्याचे म्हटले आहे. मात्र निलंबनाचे कारण नमूद केले नाही. काही दिवसांपूर्वी तिवारी यांनी पुन्हा राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर अन्य चार खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्यामुळेच जेडीयूने त्यांचे निलंबन केल्याचे बोलले जात आहे.
जनता दलातून शिवानंद तिवारींची हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाई केल्याच्या मुद्दय़ावरून संयुक्त जनता दलाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य शिवानंद तिवारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत पक्षातून हकालपट्टी केली आहे.
First published on: 28-02-2014 at 12:03 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jd u expels shivanand tiwari four other mps