देशात लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी आणि केजरीवाल यांच्या उमेदवारीमुळे बहुचर्चित झालेल्या वाराणसी लोकसभा मतदार संघात जनता दल यूनायटेड(जदयू) पक्षाने आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि वाराणसी मतदार संघातील उमेदवार अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
‘जदयू’चा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना विरोध आहे. त्यामुळे वाराणसीत ‘आप’चे उमेदवार अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणार असल्याचे जदयूचे प्रवक्ते राजीव राजन प्रसाद यांनी सांगितले. तसेच काँग्रेस आणि भाजप विरोधकांना एकत्र आणून भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची आणि देशाचे निधर्मवादीपण बळकट करण्याची  ‘जदयू’ची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
पक्षाचे अध्यक्ष शरद यादव आणि सचिव के.सी.त्यागी वाराणसी मतदार संघात केजरीवालांच्या समर्थनार्थ प्रचार करणार असल्याचे ‘जदयू’ नेते निरज कुमार यांनी सांगितले आहे. 

Story img Loader