बिहारमध्ये जद(यू)मध्ये अलीकडेच मोठय़ा प्रमाणावर झालेली बंडखोरी आणि नेतृत्वबदल झाल्यानंतर सत्तारूढ पक्षाने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले असून १० उपाध्यक्ष आणि १४ सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहार जद(यू)चे अध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंग यांनी पक्षाच्या मुख्यालयात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. नव्या रचनेत संजय सिंग, नीरजकुमार, अश्मतुल्लाह बुखारी, राजीव रंजन प्रसाद आणि अजय आलोक या पाच जणांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सहा सचिव आणि आठ संघटन सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिहार जनता दलात मोठे फेरबदल
बिहारमध्ये जद(यू)मध्ये अलीकडेच मोठय़ा प्रमाणावर झालेली बंडखोरी आणि नेतृत्वबदल झाल्यानंतर सत्तारूढ पक्षाने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले असून १० उपाध्यक्ष आणि १४ सरचिटणीसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
First published on: 05-07-2014 at 04:59 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu to contest assembly polls under nitish kumar leadership