प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे उमेदवार कुमार विश्वास यांच्यासह २० जणांविरोधात येथील सुल्तानपूर जिल्ह्य़ात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभेसाठी कुमार विश्वास आम आदमी पक्षाचे अमेठीमधून उभे राहिले आहेत.
कुमार विश्वास आणि अन्य २० अज्ञातांविरोधात सदर कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप कुमार यादव यांनी दिली. कुमार विश्वास यांनी शुक्रवारी स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता जिल्ह्य़ात रॅली काढल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती, असे यादव यांनी सांगितले.

Story img Loader