जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा अमेठीत मतदार संघातील लोकसभा उमेदवार आणि आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. अशा प्रकारची धमकी आल्याबद्दल राहुल आणि प्रियंका गांधींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे विश्वास यांनी सांगितले आहे. तसेच हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर मांडणार असल्याचेही ते म्हणाले. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीयाने जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रियंका गांधी यांच्या निवासस्थानी बोलाविले असल्याचा खुलासा करणारे ट्विट कुमार विश्वास यांनी केले आहे.
अमेठी मतदार संघात काँग्रेसचे राहुल गांधी, ‘आप’चे कुमार विश्वास आणि भाजपच्या स्मृती इराणी या दिग्गजांमध्ये तिहेरी लढत आहे. त्यामुळे सध्याच्या दिवसांत अमेठीतील राजकीय वातावरण तापलेले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा