मावळ लोकसभेच्या रिंगणात १९ उमेदवार असले, तरी महायुतीचे श्रीरंग बारणे व शेकाप-मनसेच्या पािठब्यावर लढणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन थेट उमेदवारी मिळालेले राहुल नार्वेकर यांच्यात होणाऱ्या या सामन्याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. राष्ट्रीय मुद्दय़ांपेक्षा मावळात स्थानिक विषयांवर भर असून उमेदवारांचे वैयक्तिक संबंध व नात्यागोत्याच्या राजकारणाचा अधिक प्रभाव आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर फडकवलेला ‘भगवा’ कायम राखण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असून गेल्या वेळी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनसुबे आहेत.
पुणे जिल्ह्य़ातील चिंचवड, िपपरी, मावळ विधानसभा आणि रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, उरण, कर्जत विधानसभा क्षेत्र मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन बाबर गेल्या वेळी निवडून आले, त्याचा पवारांना चांगलाच धक्का बसला होता.  नार्वेकर वगळता अन्य उमेदवार िपपरी-चिंचवडचे असून या ठिकाणी साडेआठ लाखांहून अधिक मतदार आहे. नार्वेकर यांच्यासाठी खुद्द अजित पवार यांनीच कंबर कसली असली, तरी शहरातील मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यताच अधिक प्रमाणात आहे. मात्र, मावळ व घाटाखालच्या भागातील मते निर्णायक ठरतील, असे स्पष्ट चित्र आहे. अनधिकृत बांधकामे, मावळ गोळीबार, राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी, िपपरी पालिकेतील भ्रष्टाचार आदी स्थानिक मुद्दे प्रामुख्याने प्रचारात असून नरेंद्र मोदी यांचा प्रभावही दिसतो आहे.
निवडणुका जाहीर झाल्यापासून मावळात बरीच उलथापालथ झाली आहे. गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये गेले. बाबरांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने श्रीरंग बारणेंना संधी दिली. पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करत बाबरांनी मनसेचा रस्ता धरला. शिवसेना व शेकापची युती तुटली. राष्ट्रवादीशी कथित काडीमोड घेतलेल्या लक्ष्मण जगतापांना शेकापने उमेदवारी दिली, त्यांना राज ठाकरे यांनी पुरस्कृत केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नार्वेकरांऐवजी जगतापांचे काम करतात म्हणून अजितदादांनी अनेकांना दमात घेतले. प्रारंभी काँग्रेसने असहकार पुकारला व अजितदादांच्या सांगण्यावरून मागेही घेतला. अशा नाटय़मय घडामोडींमुळे मावळात नुसता ‘संशयकल्लोळ’ आहे. नार्वेकरांची मदार अजितदादा व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर आहे. चळवळीतील आपचे मारूती भापकर यांना मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. तथापि, बारणे यांचे कडवे आव्हान जगताप तसेच नार्वेकर यांच्यासमोर आहे.

मावळ मतदारसंघ म्हणजे अर्धा कोकण व अर्धा पुणे जिल्हा. शहरी व औद्योगिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान शोधले पाहिजे. नवनवीन प्रकल्प येत असून त्यासाठी जमिनींचे संपादन होत आहे, जागामालकांना योग्य पध्दतीने न्याय्य मोबदला मिळावा. जमीन परताव्याचा विषय महत्त्वाचा आहे. लोणावळा, माथेरान यासारखी ठिकाणे जागतिक पातळीवरील पर्यटनस्थळे होऊ शकतात. मात्र, पर्यटक आकर्षित होईल, अशाप्रकारे ती विकसित होऊ शकली नाहीत. तशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.
राहुल नार्वेकर (आघाडी)

Solapur, Uddhav Thackeray group leader, benami assets,
सोलापूर : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याकडे ११.१२ कोटींची बेनामी मालमत्ता, बार्शीत गुन्हा दाखल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका

केंद्रातील भ्रष्टाचारी व राज्यातील निष्क्रिय सरकारला जनता कंटाळली असून त्यांना सक्षम पर्याय हवा आहे. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावे, त्यांचेच सरकार यावे, अशी सामान्यांची भावना असल्याने अन्य कोणताच ‘फॅक्टर’ चालणार नाही. अनधिकृत बांधकामे, रेडझोन, मिसाईल, जेएनपीटीतील वाहतूक समस्या, शेतजमिनींचा साडेबारा टक्के परतावा, लोकल रेल्वे असे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, मावळचा चेहरामोहरा बदलू.
श्रीरंग बारणे (महायुती)

अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, साडेबारा टक्के परतावा, पूररेषेचा प्रश्न शासनाने सोडवला नाही म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी उमेदवारी नाकारली. १९८६ पासून अनेक पदांवर काम केले, त्यातून परिसरात विकासाची गंगा आणली. नियोजनबद्ध विकास करून मावळला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ करायचे आहे, त्यासाठी मावळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार आहे.
– लक्ष्मण जगताप
(शेकाप-मनसे आघाडी)