या रखरखत्या उन्हात तुम्ही येथे बसून आहात. ती तुमची एक तपस्याच आहे. ती मी वाया जाऊ देणार नाही. कॉंग्रेस मुक्त जिल्हा आपण केला आहात. तुम्ही सर्व मतदारांनी काँग्रेस मुक्त भारताचा पाया रचला आहे. आता आपणाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. या देशाला लुटणारे, उध्वस्त करणारे आता वाचणार नाहीत, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी आज येथील अकोला क्रिकेट क्लब मदानावरील भाषणात केले. मोदींनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली. अकोल्यातील या मैदानावरील ही गर्दी व जनता राजकीय पंडितांना हा संदेश देत आहे की, हे तुफान आता त्सुनामीत बदलणार आहे व त्यात देशाला लुटणारे, बरबाद करणारे, उध्वस्त करणारे कोणी वाचणार नाही. केंद्रात व या राज्यात गेल्या १० वर्षांंपासून सोनिया गांधींचे सरकार आहे. या सरकारने लोकांच्या समस्या वाढविल्या, सुविधा दिल्या नाहीत. भारत मुक्त काँग्रेस झाल्यास या समस्या सुटतील, असे मोदी म्हणाले.

Story img Loader