लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. गोवा, आसाम, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमधील सात मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत आहे. या राज्यांमधील तब्बल ७४ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. गोव्यामधील दोन मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. उत्तर गोव्यामधून भाजपने विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांनाच उमेदवारी दिलेली आहे, तर काँग्रेसने रवी नाईक आणि आम आदमी पक्षाने दत्ताराम देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे. दक्षिण गोव्यातून भाजपचे नरेंद्र सवाईकर, काँग्रेसचे अ‍ॅलेक्सिओ रेजिनाल्डो आणि आपच्या स्वाती केरकर एकमेकांविरोधात लढत देणार आहे. आसाममध्ये ७ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले होते. शनिवारी दुसऱ्या टप्प्यासाठी तीन मतदारसंघात मतदान होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा