‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजप उपस्थित करत आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांची अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये भूमिका करताना कोणतीही हरकत नव्हती असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपला लगावला. हेमा मालिनी यांचे धर्मात्मा चित्रपटातील गाणे तुम्ही ऐकले असेल! ते प्रेम करण्यास प्रोत्साहन देणारे होते किंवा नाही, असा सवालही यादव यांनी केला. हेमा मालिनी यांचा १९७५ मधील हा चित्रपट. या चित्रपटात फिरोझ खान यांचीही भूमिका होती.

Story img Loader