भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह ७१ वर्षीय महाजन यांच्या नावाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. अध्यक्षनिवडीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. महाजन यांची निवड झाल्यास लोकसभेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरतील. मावळत्या अध्यक्षा मीरा कुमार यांनी हे पद भूषवले आहे.
 नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाजन यांनी मध्यप्रदेशच्या इंदूरमधून चार लाख ६७ हजार इतक्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. १९९९ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये महाजन यांनी राज्यमंत्रिपद भूषवले होते.

Story img Loader