राजु शेट्टी
*राजकीय पक्ष: स्वाभिमानी पक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
*वय: ४६
*शिक्षण: यंत्र अभियांत्रिकी पदविका
*संपत्ती:
*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: हातकणंगले
या मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले आहेत. राजु शेट्टी यांनी २००९ राष्ट्रवादीच्या निवेदीता माने यांचा एक लाखांच्या मताधिक्याने पराभावकरून प्रथमच लोकसभेत. राष्ट्रवादीने यावेळी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. हातकणंगले मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ आहे. १९६७ चा अपवाद वगळता ९ वेळा यामतदारसंघाने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. १९९९ आणि २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या निवेदीता माने यामतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. २००९ च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
*प्रतिस्पर्धी कोण होते: कल्लाप्पाण्णा आवाडे (काँग्रेस), रघुनाथदादा पाटील (आप)
*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने मांडून ते सोडविण्यासाठी लढणारा नेता अशी शेट्टी यांची प्रतिमा आहे. शेतकरी संघटनेतून राजकारणाला सुरूवात. शरद जोशी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. नंतर निवडणुकीच्या राजकारणात उतरले. जिल्हापरिषद सदस्य, शिरोळमधून विधानसभा सदस्य राहिले आहेत. २००९ च्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.
*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही
*लक्षवेधक: यावेळी राजु शेट्टी महायुतीमध्ये सामिल झाल्यामुळे २००९च्या निवडणुकीत शिवसेनेच्या पारड्यात पडलेली मते शेट्टी यांना मिळतील अशी शक्यता होती. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. खासदार राजु शेट्टी यांनीही मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शेतकरी संघटनेतील त्यांचे एके काळचे सहकारी रघुनाथदादा पाटील आपच्या उमेदवारीवर शेट्टी यांच्या विरोधामध्ये निवडणुक लढले.