शिवाजीराव आढळराव पाटील
*राजकीय पक्ष: शिवसेना
*वय: ५८
*शिक्षण: प्रथमवर्ष बी.ए.
*संपत्ती: २५.३५ कोटी

*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: शिरूर
काँग्रेस व राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ. शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यावर शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.  

*प्रतिस्पर्धी कोण होते: देवदत्त निकम (राष्ट्रवादी काँग्रेस)

*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरूवात. शिवसेनेच्या उमेदवारीवर दोन वेळ लोकसभेवर.

*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही

*लक्षवेधक: शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वआमदार राष्ट्रवादीचे, पण खासदार शिवसेनेचे आहेत. गेल्या दहा वर्षांपासून  शिवाजीराव आढळराव-पाटील या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व कोले. लोकांमध्ये मिसळणारा नेता अशी ओळख.

Story img Loader