गोपीनाथ मुंडे
*राजकीय पक्ष: भाजप
*वय: ६४
*शिक्षण: बी. कॉम
*संपत्ती: ३८ कोटी
*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: बीड, या मतदार संघामध्ये ७ वेळा काँग्रेस, पीडीएफ, जद, भाकप आणि माकप प्रत्येकी एक वेळ, भाजप ३ वेळी प्रतिनिधीत्व केले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गोपिनाथ मुंडे यांनी ५, ५३, ९९५ मते मिळवत पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश मिळवला.
*प्रतिस्पर्धी कोण होते: सुरेश धस (राष्ट्रवादी), नंदु माधव (आप)
*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) भारतीय विद्यार्थी परिषद या भाजपच्या विद्यार्थी आघाडीमधून राजकारणात प्रवेश. भाजयुमो चे राज्याध्यक्ष, महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद, युती शासन काळात राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय अपाध्यक्ष, १५ लोकसभेत भाजपचे उपनेते.
*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही
*लक्षवेधक: गोपिनाथ मुंडे यांचा विजय गृहित धरून, निकालानंतर विजय साजरा करण्यासाठी बीडमधील व्यापाऱ्यांनी ६० टन गुलाल आणि फूल दुकानदारांनी मोठया प्रमाणावर फुले व हारांची तयारी केली आहे.