नितीन गडकरी
*राजकीय पक्ष: भाजप
*वय: ५८
*शिक्षण: एम.कॉम. एलएलबी
*संपत्ती: ६,८०,३६,२३९
*निवडणुकीसाठी मतदारसंघ कोणता आणि मतदारसंघाची पार्श्वभूमी: नागपूर<br />नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये १९६२ माधव श्रीहरी अणे (अपक्ष), १९७१ जांबुवंतराव धोटे (फॉर्वर्ड ब्लॉक), १९९६ बनवारीलाल पुरोहित हे तीन अपवाज वगलता काँग्रेसनेच प्रतिनिधीत्व केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदार संघातून निवडून गेले आहेत. भाजपचे बनवारीलाल पुरोहित १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते.
*प्रतिस्पर्धी कोण होते: काँग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार आणि आपच्या अंजली दमानिया
*उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी (आतापर्यंत कोणती पदे भूषविली, राजकीय प्रवास याबद्दल) भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. नागपूर विद्यापीठात शिक्षण घेत असताना भारतीय विद्यारथी परिषद या भाजपच्या विद्यार्थी आघआडीमधून राजकारणात प्रवेश. नागपूरचे महापौरपद, त्यानंतर १९८९ मध्ये नागपूर पदविधर मतदार संघातून महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर निवडून आले. विधानसभेचे एकही निवडणूक न लढवणारे गडकरी ५ वेळा विधान परिषदेवर निवडून गेले. १९९५ राज्याचे सार्वजणीक बांधकाम मंत्री, मुंबईमध्ये ५५ उड्डाणपुल बांधले, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग.
*गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का?
नाही
*लक्षवेधक: राज्यातील पक्षनेतृत्वावरून भाजपचे राज्यातील नेते गोपिनाथ मुंडे यांच्याशी सतत स्पर्धा. मुंडेकडे राज्याची जबाबदारी सोपवल्यावर नितीन गडकरी राष्ट्रीय राजकारणाकडे वळले.