पश्चिम बंगाल राज्यातील सत्ता गमावल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला लोकसभा निवडणुकीतही जबरदस्त पराभवाचा तडाखा बसला असून केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. तर तृणमूल काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारत ३४ जागा जिंकल्या.
देशात मोदींची लाट असताना पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहीली. त्यांच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर डाव्या आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. २७ टक्के मते मिळवूनही पक्षाला हादरा बसला. माकपने तृणमुलच्या करयकर्त्यांनी दहशत पसरवल्याचा आरोप करत त्यावर पराभवाचे खापर फोडले आहे. भाजपने राज्यात दोन जागा जिंकताना चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता विधानसभेसाठी भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसने कामगिरीवर समाधान व्यक्त केले असले तरी केंद्रीय मंत्री दीप दासमुन्शी पराभूत झाल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत पुन्हा एकदा चुरशीच्या लढतीत पराभूत झाले. तीसच्या वर जागा जिंकण्याची ममतांची महत्त्वकांक्षा पुर्ण झाली आहे. मात्र केंद्रात भाजपचे सरकार आल्याने आता संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे. प्रचारात ममता विरुद्ध मोदी यांच्या शाब्दीक चकमक घडली होती. डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाल्याने आत्मचिंतन करावे लागणार आहे. काँग्रेसची राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यांची मते एकाच ठिकाणी एकवटल्याने त्यांना या जागा जिंकता आल्या. अन्यथा त्यांची टक्केवारी भाजप इतकीच आहे. या निकालाने ममतांचे बंगालमधील स्थान भक्कम झाले आहे. तर डाव्यांसाठी पदरी निराशा पडली आहे.
बंगाली जनतेची ‘ममता’ कायम
पश्चिम बंगाल राज्यातील सत्ता गमावल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीला लोकसभा निवडणुकीतही जबरदस्त पराभवाचा तडाखा बसला असून केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले आहे.
First published on: 17-05-2014 at 05:18 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee holds ground in west bengal