मुस्लीम बांधवांच्या मनात भाजपच्या विरोधकांनी चुकीचा समज पसरविला आहे; मात्र भाजप सत्तेवर आल्यास त्या समाजातील जनतेच्या मनातील हा समज निश्चितच दूर होईल. घटनेतील निकषांना अनुसरूनच आमचे सरकार कारभार करील, असे नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. गुजरातमधील पाळत प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोग नियुक्त करण्याची घोषणा करून काँग्रेसचे सरकार सुडाचे राजकारण करीत आहे. मोदी आणि भाजपने जे चित्र रंगविले आहे ते एकच आहे. सरकार घटनेनुसारच कारभार करणार असल्याचे शहा म्हणाले. मोदींचे सरकार असो की वाजपेयी यांचे, देशाचा कारभार घटनेला अनुसरूनच व्हावयास हवा, असेही त्यांनी सांगितले.
भाजप सत्तेवर आल्यास मुस्लिमांच्या मनातील गैरसमज दूर होईल- शहा
मुस्लीम बांधवांच्या मनात भाजपच्या विरोधकांनी चुकीचा समज पसरविला आहे; मात्र भाजप सत्तेवर आल्यास त्या समाजातील जनतेच्या मनातील हा समज निश्चितच दूर होईल.

First published on: 06-05-2014 at 01:32 IST
TOPICSलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi as pm will remove muslims misunderstanding amit shah