माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी हीन दर्जाचे राजकारण करत असून, हे राजकारण त्यांना आणि राष्ट्रीय राजकारणाला शोभणारे नाही, असे शरसंधान सोनिया यांनी केले.
मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श घ्यावा. वाजपेयींसह अन्य माजी पंतप्रधानांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली. मात्र राजीव गांधी यांच्यावर टीका करून मोदी यांनी आपण या पदाला लायक नसल्याचे दाखवून दिले आहे. राजकारणात क्षुल्लक मुद्दे आणून मोदी हीन पातळीचे राजकारण करत आहेत, असे सोनिया म्हणाल्या. राजीव गांधी ज्या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते, त्या वेळी त्यांनी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा जाहीर अवमान केला होता, अशी टीका मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेठी येथील सभेत केली होती.
मोदींकडून हीन दर्जाचे राजकारण ; सोनिया गांधी यांचा आरोप
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी जोरदार टीकास्त्र सोडले.

First published on: 09-05-2014 at 12:27 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra ModiलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi playing politics of trivialities sonia gandhis allegations