लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरण्यात येणारी भाषा आणि त्याचा सूर यांनी अगदी खालची पातळी गाठली आहे. आपल्या कुटुंबीयांबाबत अश्लाघ्य मजकूर असलेल्या पुस्तिकांचे अमेठीत वाटप करण्यात आले, असा आरोप प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्या येथे आल्या होत्या. स्वत:साठी सत्ता हवी असलेली एक व्यक्ती देशात असून त्यासाठीच ती व्यक्ती मतदान करण्याची सातत्याने मागणी करीत आहे, अशी टीका त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. आपल्या सभास्थानी, सभेच्या पूर्वसंध्येस गांधी व वढेरा कुटुंबीयांवर निराधार आरोप करणाऱ्या अश्लाघ्य भाषेतील पुस्तिका वितरित करण्यात आल्या, असा आरोपही प्रियंका यांनी केला. राजकारणाकडे सेवा या दृष्टिकोनातून पाहिले जात नाही, असेही त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा