मुस्लिमांना हिंदूबहुल परिसरात घर किंवा दुकाने घेऊ देऊ नका, त्यांनी तसे केले असल्यास त्यांना तेथून हुसकावून लावा, या आशयाच्या वक्तव्यांवरून टीकेचे लक्ष्य ठरलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटक प्रवीण तोगडिया यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी फटकारले आहे. भाजपचे हितचिंतक म्हणवणाऱ्यांनी केलेली अशा प्रकारची वक्तव्ये आपल्याला मान्य नसून ते प्रचाराची दिशा भरकटवू पाहात आहेत. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नसल्याचे मोदी यांनी सुनावले आहे.
तोगडिया यांनी भावनगर येथे शनिवारी झालेल्या सभेत प्रक्षोभक भाषण करताना मुस्लिमांविरोधात वरीलप्रमाणे अनुदार उद्गार काढले होते. तसेच बिहारमधील भाजपचे नेते गिरिराजसिंह यांनीही मोदीविरोधकांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. तोगडिया आणि गिरिराज या दोघांच्याही वाक्ताडनाचा मोदी यांनी मंगळवारी समाचार घेतला. त्यांनी केलेल्या ट्विप्पण्यांमध्ये या दोन्ही नेत्यांना अनुल्लेखांनी मोदींनी फटकारले आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्यांपासून आपण चार हात लांबच राहण्यात धन्यता मानत असून अशा व्यक्तींनीही वक्तव्ये करताना भान राखावे, असा उपरोधिक सल्लाही मोदींनी ट्विप्पणीच्या माध्यमातून दिला आहे.
भाजप विकासाच्या मुद्दय़ावर ठाम
तोगडिया आणि गिरिराज यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेला धुरळा बसावा यासाठी भाजपनेही पुढाकार घेत विकासाच्या मुद्दय़ावरच पक्षाने ही निवडणूक लढवली आहे.जातीपातीच्या किंवा धर्माच्या आधारावर निवडणुका लढवण्याला प्राधान्य दिलेले नाही. काँग्रेसला केंद्रातून सत्ताभ्रष्ट कसे करता येईल या बाबींनाच जास्त महत्त्व देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी येथे स्पष्ट केले.
काँग्रेसचा हल्ला
तोगडिया आणि गिरिराज यांच्या वक्तव्यांमुळे आयतेच कोलीत हाती मिळालेल्या काँग्रेसने भाजपसह संघपरिवार व शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांच्या ध्वनिचित्रफितीच मंगळवारी प्रसिद्ध केल्या.
प्रक्षोभक वक्तव्ये मोदींना अमान्य
मुस्लिमांना हिंदूबहुल परिसरात घर किंवा दुकाने घेऊ देऊ नका, त्यांनी तसे केले असल्यास त्यांना तेथून हुसकावून लावा, या आशयाच्या वक्तव्यांवरून टीकेचे लक्ष्य
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-04-2014 at 02:03 IST
TOPICSगिरीराज सिंहGiriraj Singhनरेंद्र मोदीNarendra Modiप्रवीण तोगडियाPravin TogadiaलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 3 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi snubs togadia and giriraj for hate speeches