निवडणुकीच्या मोसमात स्वपक्षात होत असलेल्या अत्याचाराची जाणीव होते. त्यात उमेदवारी मिळत नाही. वगैरे वगैरे..अशा वेळी वेगवेगळ्या पक्षांमध्ये घुसखोरी सुरू होती. जगदंबिका पाल असेच एक घुसखोर. हे आम्ही म्हणत नाही. भाजप नेते म्हणतात. तर जगदंबिका पाल यांचा भाजपप्रवेशाचा सोहळा (?) म्हणजे झटपट कार्यक्रम होता. दिवसभर बैठक असल्याने सभागृहाऐवजी भाजप कार्यालयाच्या आवारात पाल यांच्या प्रवेशाचा सोहळा उभ्या उभ्यानेच उरकण्यात येणार होता. अशा वेळी मग छायाचित्रकार व वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांच्यात फक्त हाणामारीच व्हायची बाकी असते. कारण दोघांनाही हा सोहळा कव्हर करायचा असतो. बरं खुद्द राजनाथ सिंह असे आवारात उभे राहणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांना हुरूप आला. राजनाथ सिंह बोलायला उभे राहिले तोपर्यंत त्यांच्याभोवती दाटीवाटीने कार्यकर्ते पुढे सरकत होते. त्यांनी कशीबशी पाल यांच्या प्रवेशाची घोषणा केल्यावर एक मोठ्ठा हार घेऊन दोन-तीन कार्यकर्ते रेटारेटी करत पुढे सरकू लागले. मोदीनामाचा गजर सुरू झाला. अधूनमधून राजनाथ सिंह यांचेही नाव घेतले जात होते. हा हार इतका मोठा होता की, साधारण वजन-उंचीची अर्धा डझन माणसे त्यात ‘कोंबता’ आली असती. हार राजनाथ सिंह यांच्या गळी उतरवण्यात आला. त्यात पालसोबतीला राजू श्रीवास्तव यांना घुसवण्यात आले व उरल्यासुरल्या जागेत हौशे – नवशे कार्यकर्ते शिरू लागले. बरं, त्यांचं लक्ष केवळ कॅमेऱ्यांकडे होतं. बरं हारच तो! अवघ्या काही सेकंदांत गळ्यातल्या हाराच्या पाकळ्या आवारात पसरल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा