मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी समाजावादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी राज्यघटनेत सुधारणा करून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. समाजवादी पक्षच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकतो असे सांगून त्यांनी देशात तिसऱ्या आघाडीचे सरकार येईल असे सांगितले.
मुसलमानो ने देश को बनाया हैं और मुसलमानो के लिये संविधान में संशोधन करके आरक्षण दिया जायेगा, असे ते म्हणाले.समाजवादी पक्षाचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांचे पुत्र अक्षय यादव यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेत त्यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखू शकेल. मुलायम म्हणाले की, समाजवादी पक्ष भाजपवर हेरगिरी करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे, पण वास्तवात भाजपचे लोक स्वत:च आम्हाला सगळी माहिती देत आहेत. गुजरातचे विकासाचे मॉडेल हा खोटारडेपणा आहे. भाजपमध्ये मतभेद असून त्यांना २७२ जागा मिळवता येणार नाहीत. निवडणुकीनंतर तिसऱ्या आघाडीचे सरकार येईल. लोकसभेत समाजवादी पक्षाला जास्त जागा मिळतील. काँग्रेसवर हल्ला करताना ते म्हणाले की, त्यांचे नेते इंग्रजीत बोलतात पण मतदानावेळी हिंदूीतून बोलून मते मागतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा