पुणे आणि लातूर वगळता राज्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली असून माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वादात या मतदारसंघांतील उमेदवार निश्चित होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यावर निर्णय सोपविण्यात आला असून तो एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. रावेर मतदारसंघातील उमेदवार बदलीचा निर्णयही बुधवारी होऊ शकलेला नाही.
पुण्यातून मुंडे यांनी श्रीकांत शिरोळे यांचे नाव पुढे केले आहे, तर गडकरी यांनी त्यांना विरोध केला असून आमदार गिरीश बापट यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित होऊ शकलेले नाही. लातूरमधून टी.पी. कांबळे यांच्यासाठी मुंडे प्रयत्नशील असून गडकरी यांचा आमदार सुधाकर भालेराव यांच्यासाठी आग्रह आहे. रावेर मतदारसंघातून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पण मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे व अन्य काही कारणांमुळे जावळेंना बदलण्याची मागणी आहे.
मुंडे- गडकरी वादात पुणे- लातूरचे गाडे अडले
पुणे आणि लातूर वगळता राज्यातील भाजपच्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली असून माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वादात या मतदारसंघांतील उमेदवार निश्चित होऊ शकलेले नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-03-2014 at 03:40 IST
TOPICSगोपीनाथ मुंडेGopinath Mundeनितीन गडकरीNitin GadkariलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 2 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munde gadkari dispute on pune latur constituency