बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार यांच्यावर उघडपणे टीका करत, मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचे सत्यानाथ होईल असे म्हटले आहे.
मायावती म्हणाल्या की, “आज दंगली उसळण्याला कारणीभूत असणार व्यक्ती देश दंगलमुक्त होण्याच्या घोषणा करत आहे. नरेंद्र मोदी गुजरात दंगलींना कारणीभूत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून देशाचे काही चांगले होईल अशी अपेक्षाच बाळगू नये.” याचबरोबर आजवर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने मागास वर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर अल्पसंख्यांकांसाठी काहीच केलेले नसल्याचे मायावती म्हणाल्या.

Story img Loader