भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, ही निव्वळ फॅंटसी असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी मोदींना लक्ष्य केले. निवडणुकीनंतर देशात तिसऱय़ा आघाडीचे सरकार येईल, असेही भाकीत त्यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगाल आणि गुजरात या दोन राज्यांची तुलना करण्यासही त्यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या, श्रीमंतीत वाढलेले, विशेष फायदे मिळालेले बालक आणि कुपोषित, दुर्लक्षित राहिलेले बालक यांच्यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही.

Story img Loader