गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे उच्चवर्णीयच असून राजकीय फायदे, लाभ मिळविण्यासाठी त्यांनी ‘इतर मागासवर्गीय वर्गा’शी (ओबीसी) संबंधित असलेल्या दर्जात फेरफार केला असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसने गुरुवारी केला. निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली असताना तसेच मोदी लढवीत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील निवडणूकही अगदी तोंडावर आलेली असताना काँग्रेसच्या या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची दाट शक्यता आहे.
मोदी यांचे कडवे टीकाकार आणि काँग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंग गोहील यांनी आपल्या या आरोपाची पुष्टी देताना गुजरात सरकारचे एक परिपत्रकच सादर केले. मोदी २००१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपण ‘मोद घंचीस’ या अन्य मागासवर्गीय वर्गाशी संबंधित असल्याचे म्हटले होते. या परिपत्रकात या बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे, याकडे गोहील यांनी लक्ष वेधले. आपण इतर मागासवर्गीय जातींशी संबंधित असल्याच्े सांगुन मोदी हे सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अन्य मागासवर्गीयांची मते आपल्याला मिळविण्यासाठी मोदी हे आपण त्यांच्याशी संबंधित असल्याचे प्रचारात सांगत असले तरी ते ‘ओबीसी’ नाहीत. ते अत्यंत श्रीमंत आणि प्रगत अशा ‘मोद घंचीस’ जातीशी संबंधित आहेत आणि मोदी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी सदर जमात अन्य मागासवर्गीयांमध्ये केव्हाही गणली गेली नव्हती किंवा त्यांना आरक्षणही देण्यात आले नव्हते. या उच्च जातीचा समावेश अन्य मागासवर्गीयांच्या यादीत करून मोदी यांनी ‘ओबीसीं’चे हक्क हिरावण्याचे पाप केले आहे, असा आरोप गोहील यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा