भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथूनच लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तेथील विद्यमान खासदार व ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे कानपूरमधून उभे राहणार आहेत. पक्ष सरचिटणीस अनंत कुमार यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पक्षाच्या अन्य उमेदवारांत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह (लखनऊ), अरुण जेटली (अमृतसर), शत्रुघ्न सिन्हा (पाटणा), सत्यपाल सिंह (बागपत), किरण खेर (चंदीगढ), वरुण गांधी (सुल्तानपूर), मनेका गांधी (पीलभीत), उमा भारती (झाशी) हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी आणि उदित राज (तिघेही दिल्ली)  यांचा समावेश आहे. गुजरातची यादी १९ मार्चला जाहीर होणार असून त्याचवेळी लालकृष्ण अडवाणी यांचीही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Story img Loader