भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथूनच लोकसभा निवडणूक लढणार आहेत. तेथील विद्यमान खासदार व ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हे कानपूरमधून उभे राहणार आहेत. पक्ष सरचिटणीस अनंत कुमार यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पक्षाच्या अन्य उमेदवारांत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह (लखनऊ), अरुण जेटली (अमृतसर), शत्रुघ्न सिन्हा (पाटणा), सत्यपाल सिंह (बागपत), किरण खेर (चंदीगढ), वरुण गांधी (सुल्तानपूर), मनेका गांधी (पीलभीत), उमा भारती (झाशी) हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी आणि उदित राज (तिघेही दिल्ली) यांचा समावेश आहे. गुजरातची यादी १९ मार्चला जाहीर होणार असून त्याचवेळी लालकृष्ण अडवाणी यांचीही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा