नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते पंतप्रधान होणार नाहीत, कारण जनतेला आता त्यांचा खरा चेहरा कळला आहे, असे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. मोदी कधीही पंतप्रधान होणार नाहीत, हे आपण अनुभवाच्या आधारावरून सांगत आहोत. स्वत:च्या राज्यातील जनतेला बनावट चकमकीत ठार मारणारी व्यक्ती जनतेला हवी आहे का, अल्पसंख्य समाज मग तो मुस्लीम असो वा शीख, त्या समाजाविरुद्ध असलेली व्यक्ती मतदारांना पंतप्रधानपदी नको आहे, असेही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi will never become pm kapil sibal