जर आपल्या एखाद्या वृत्तीमुळे दंगली होऊन नागरिकांना आपले जीव गमवावे लागले, तर नरेंद्र मोदींवर हल्ला होणार हे उघडच असल्याचे समजून घेतले पाहिजे असे विधान केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केले आहे.
वर्मा म्हणतात की, गुजरातसारख्या दंगली भडकून नागरिकांच्या हत्याही झाल्या, मग जेथे माणसांना आपला जीव गमवावा लागला त्यावरून मोदींवर हल्ला होणारच ही पार्श्वभूमी भाजपने मान्य करायला हवी. तथापि, नरेंद्र मोदींना गरजेनुसार योग्य ती सुरक्षाही देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशात दहशतवादी प्रवृत्ती बळावल्याचा दावाही यावेळी बेनीप्रसाद यांनी केला. “ज्याप्रमाणे बाबरी मशीद पाडण्यास लालकृष्ण अडवाणी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदीही गुजरातमधील दंगलींना जबाबदार आहेत आणि यावरून देशात दहशतवाद पसरविण्याच्या मूळाशी भाजप आहे” असेही वर्मा म्हणाले.

Story img Loader