राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज(गुरूवार) रायगडमधून लोकसभेसाठी सुनिल तटकरेंची उमेदवारी जाहीर केली. यानुसार रायगडमध्ये शिवसेनेच्या अनंत गितेंना राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे यांचे आव्हान असणार आहे.
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार भास्करराव जाधव यांनी रायगड मतदार संघातून लोकसभेसाठी सुनिल तटकरे यांची उमेदवारी जाहीर केली. परंतु, रायगडच्या बाजूच्याच मावळ मतदार संघाबाबत अजूनही अनिश्चितता पक्षाकडून कायम राखण्यात आली आहे. अद्याप मावळमधून राष्ट्रवादीने लोकसभेसाठीचा आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. सुनिल तटकरे सध्याच्या आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

रायगडमधील लोकसभा टक्कर-
सुनिल तटकरे(राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध अनंत गिते (शिवसेना) विरुद्ध संजय अपरांती (आम आदमी)

Story img Loader